Wednesday, July 27, 2016

Vidnyan Ranjan Spardha August 2016

आपली उत्तरे ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत पाठवावीत
आपके जवाब ३० सितम्बर २०१६ तक भेंजे
Send your answers by 30th September 2016

For English Translation See at the bottom
हिन्दीमें अनुवाद नीचे दिया हुआ है

 ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे  प्रवेशमूल्य नाही ० प्रश्नाची उत्तरे स्वत: विचार करून, कोणालाही विचारून, पुस्तकात पाहूनप्रत्यक्ष प्रयोग करून मिळविता येतील  प्राथमिक फेरीतील विजेत्यांची नावे ऑक्टोबर २०१६ ला पुणे येथे जाहीर करण्यात येतील.  प्राथमिक विजेत्यांची प्रात्यक्षिक प्रयोगांवर आधारित अंतिम फेरीची चाचणी ऑक्टोबर महिन्यात पुणे येथे घेतली जाईल  अंतिम फेरीतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येतील.  आपली उत्तरे फूलस्कॅप आकाराच्या कागदावर स्वत:च्या हस्ताक्षरात लिहून ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत पाठवावीत  आपल्या उत्तरपत्रिकेसोबत खालील माहिती लिहून पाठवावी
संपूर्ण नाव २पत्ता ३दूरध्वनी/भ्रमणध्वनी क्रमांक विपत्ता (ईमेलजन्मतारीख ६शिक्षण ७व्यवसाय ८पुढावा गुण
पुढावा गुण शैक्षणिक पात्रता आणि वय लक्षात घेऊन स्पर्धकांना खाली कंसात लिहील्याप्रमाणे गुणांचा पुढावा देण्यात येत आहे.
शिक्षण: पाचवीपर्यंत (१०)सातवीपर्यंत ()दहावीपर्यंत ()बारावीपर्यंत ()शास्त्रशाखेतर पदवीधर (), शास्त्र पदवीधर (0).
वय वर्षे: १२ पर्यंत ()१३ ते १६ ()१७ ते २० ()२१ ते ४० (), ४१ ते ६० (), ६१ ते ८० ()८१ च्या वर ().
उत्तरपत्रिका पाठवण्याचा पत्तामराठी विज्ञान परिषदपुणे विभागटिळक स्मारक मंदिरटिळक रस्तापुणे ४११०३० 


प्रश्न १ - निरीक्षण करून उत्तरे द्या  (गुण १०)
१.    सध्या सर्वात जास्त प्रमाणात वापरले जाणारे घरगुती विजेचा वापर करणारे उपकरण कोणते?
२.    लाल गुलाबाच्या फुलाला किती पाकळ्या असतात?
३.    १०० रुपयाच्या नोटेची पुढची आणि मागची बाजू यातला फरक डोळे मिटून कसा ओळखाल?
४.    19 ते 25 सप्टेंबर या काळात तुमच्या गावातून दिसणाऱ्या सूर्योदय आणि सूर्यास्तांच्या वेळांमध्ये कोणता फरक पडला?
५.    ५ मिनिटे जळल्यावर मेणबत्तीचे वजन किती घटते?
६.    एखाद्या मोबाईलमधून जवळात जवळ किती अंतरावरचा फोटो स्पष्ट येतो ते लिहा?
७.    क, च, ट, त, प या पाचपैकी कोणत्या वर्णाची पाचही मुळाक्षरे म्हणायला सर्वात कमी वेळ लागतो?
८.    जमिनीवर अंडे घालणाऱ्या तीन पक्षांची नावे लिहा.
९.    झेरॉक्सची पाटी आणि भाडोत्री प्रवासी वाहन यात कोणते साम्य आहे?
१०.     पाच वर्षाचे मूल व सत्तर वर्षे वयाची व्यक्ती यांच्या नाडीच्या ठोक्यात फरक काय?

प्रश्न २ - चूक की बरोबर ते स्पष्ट करा   (गुण १०)
१.    पहिल्या १० पाढ्यांमध्ये ५५ संख्या वापरल्या जातात.
२.    केळीच्या घडातली सर्व केळी एकदम पिकतात
३.    सम संख्येला ९ने भाग गेला तर ६ने भाग जातोच.
४.    जुलाब सुरू झाल्यास प्रथमोपचार म्हणून जुलाब बंद होण्याची गोळी घ्यावी.
५.    पावसाचे पाणी नेहमी शुद्धच असते.
६.    वनस्पती तूप हे वनस्पतींमध्ये बनलेले असते.
७.    भारतातल्या सर्व नद्या वरून खाली वाहतात
८.    रेडीओ लहरींचा शोध मार्कोनी यांनी लावला.
९.    सब्जा आणि तुळशी समान कुलातले आहेत.
१०.     साळींदराच्या काट्यांवरून वेल्क्रोचा शोध लागला

प्रश्न ३ - थोडक्यात उत्तर द्या  (गुण १०)
१.    *#06#हा क्रमांक मोबाईलवरून डायल केल्यावर कोणती माहिती मिळते?
२.    १०० ग्रॅम अंड्यामधून आपल्या रोजच्या गरजेला पुरून उरेल असे कोणते जीवनसत्व मिळते?
३.    PY या अक्षरांनी सुरू होणारी वाहने भारतात कोणत्या राज्यात नोंदविलेली असतात ?
४.    आईला बाळाबद्दल खूप जिव्हाळा वाटतो तेव्हा तिच्या शरीरात निर्माण होणारे रसायन कोणते?
५.    आयोडीनला गलगंड तर सेलेनियमला काय?
६.    क्षकिरणांनी हाडांचे चित्र मिळते तर शरीरातील मऊ भागाचे चित्र कोणत्या तंत्राने मिळते?
७.    खाद्य पदार्थ ठेवण्याच्या प्लास्टिकच्या डब्यावर कोणचे चिन्ह काढतात?
८.    दक्षिण अमेरिकच्या समुद्रातील कोणते दोन प्रवाह भारतातल्या पावसावर परिणाम करतात?
९.    रक्तदानापूर्वी रक्ताची कोणती तपासणी करतात?
१०.                        वृक्ष आयुर्वेद या विषयावर भारतात पहिले लिखाण करणारा कृषीतज्ज्ञ कोण?

प्रश्न ४ - शास्त्रीय कारणे लिहा  (गुण २०)
१.    आकाशातील वीज घरगुती किंवा औद्योगिक कामासाठी वापरता येत नाही.
२.    आषाढ तळायचा, श्रावण भाजायचा तर भाद्रपद उकडायचा महिना आहे.
३.    कमी पाउस पडणाऱ्या प्रदेशातील झाडांची पाने आकाराने लहान असतात.
४.    काळा रंग हा खरा रंग नसतोच
५.    टिव्हीवरील कार्यक्रम बघताना जेवण करू नये.
६.    डोकेदुखीवरच्या मलमात झोंबणारे औषध असतेच.
७.    नागपूरपेक्षा मुंबईत लोखंड लवकर गंजते
८.    फोडणी करताना मोहरी तडतडणे आवश्यक असते. 
९.    महाराष्ट्रात सूर्य बरोबर डोक्यावर असेल असे एका वर्षात दोन दिवसच असतात
१०.     मोबाईलमध्ये कॅमेऱ्याचे भिंग व पडदा यात अंतर कमी असते

प्रश्न ५ – खालील वाक्यातील ‘मी’ कोण? (गुण १०)
१.    १९४८ मध्ये स्थापन झालेल्या भारतीय अणुउर्जा आयोगाचा अध्यक्ष म्हणून माझी नेमणूक झाली.
२.    आमच्याकडे सूर्य नेहमीच पश्चिमेला उगवतो
३.    काच कापू शकणारा मी अतिशय मूल्यवान आहे.
४.    माझ्या स्थानापासून दक्षिण ध्रुवापर्यंतच्या रेषेत कोठेही जमिनीवर पाऊस पडत नाही
५.    मी इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात भारतात जन्मलो, मी अणूसिद्धांत सांगितला.
६.    मी कोणत्याही बाजूने पहा एकसारखाच दिसतो
७.    पंढरपुरी, नागपुरी, सुरती कुठलीही असो मला चिखलात फार आवडते.
८.    आमचे भाकीत शंभर वर्षांपूर्वी झाले पण सिद्ध यंदा
९.    शरीराला ऊर्जा पुरवते, आईकडूनच तुम्हाला मिळते
१०.     ताल अर्जुन साल हे सगळे माझेच प्रकार आहेत

प्रश्न ६ - सविस्तर उत्तरे लिहा -  गुण १५
१.      उत्तम दर्जाच्या धुण्याच्या पावडरीत कोणकोणती रसायने कोणकोणत्या कार्यांसाठी घालतात?
२.      क्रिकेटच्या ५० षटकांच्या सामन्यात एक फलंदाज कमाल किती धावा नाबाद राहून करू शकेल?
३.      चालकाशिवाय चालणाऱ्या वाहनांचे धोके कोणते?
४.      पृथ्वीवरील हवेत ३० कोटी वर्षांपूर्वी ३५% ऑक्सिजन होता तेव्हाचे सजीव आणि आजचे सजीव यांच्यात असू शकणारे पाच फरक लिहा?
५.      भूकंपाचा केंद्रबिंदू म्हणजे काय ? तो कसा ठरवितात ?

प्रश्न ७ - प्रयोग रचा / करा  (गुण १५)
१.      अंड्यातून बाहेर आलेले पिल्लू आपल्या आईला कशामुळे ओळखू शकत असेल? हे तपाण्यासाठी कोणत्या प्रकारचा प्रयोग करावा लागेल?
२.      कोनमापक कागदावर ठेवून न उचलता २७३०  चा कोन काढा. भूमितीय सिद्धता द्या.
३.      गहू अंकूरताना साखरच खत म्हणून वापरले तर १० दिवसात कोणता फरक पडतो? प्रयोग करा. जास्तीत जास्त तपशिलासह निष्कर्ष लिहा.

प्रश्न ८ - आकृती काढून ऊत्तरे द्या  (गुण १५)    
१.      कांडी, बांगडी, गोळा यांच्या आकाराच्या चुंबकांचे उत्तर आणि दक्षिण ध्रुव आकृती काढून दाखवा
२.      ABCDचौरसाचा कर्ण BD काढा. दुसरा कर्ण पाऊण आकाराचा AE काढा. E बिंदूतून दोन बाजूंपर्यंत जाणारी व पहिल्या कर्णाला समांतर रेषा FG काढा. त्याच टोकातून DC बाजूला समांतर रेषा पहिल्या कर्णाला H येथे मिळेपर्यंत काढा. आणि बिंदूंमधून पहिल्या कर्णावर लंब टाका. कोणकोणत्या आणि किती भौमितीक आकृत्या दिसतात ते लिहा.
३.      धुळे, रत्नागिरी आणि वाशिम या गावांमधून तीन गट मोटारींतून एकाच वेळी निघाले. त्यांना पुढील अटी पाळून महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त शहरांमधून जायचे होते. १) प्रवास सुरू केल्यापासून १०० किमीच्या आत थांबायचे नाही. २) १०० ते १५० किमी प्रवासादरम्यानच काटकोनात दिशा बदलायची. ३) ५००० किमी इतकाच प्रवास करायचा. कोणत्या गटाचा मार्ग कसा असेल ते नकाशात दाखवा.


आवाहन – स्वत: भाग घ्या. इतरांना प्रोत्साहन द्या. प्रश्नावलीचा प्रचार आणि प्रसार करा.. बक्षिसासाठी रक्कम द्या. तुम्हाला पडलेले प्रश्न आम्हाला पाठवा. आमचा ब्लॉग पहा. http://mavipapunevibhag.blogspot.in
मराठी भाषा, विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यात आपले योगदान द्या.

संपर्क: मराठी विज्ञान परिषदपुणे विभाग. टिळक स्मारक मंदिरटिळक रस्तापुणे ३०. संजय नाईक ९४२२५१९४२०

Vidnyan Ranjan Spardha August 2016
Questioner

Q.1 Answer by doing observations (Marks 10)
1. Which domestic electrical appliance is mostly used now a day?
2. How many petals are there in red rose?
3. How will you recognize front side and back side of a 100 Rs’ note with your closed eyes?
4. What was the difference between the sunrise and the sunset observed from 19 to 25 September?
5. How much weight of a candle gets reduced on burning it for 5 minutes?
6. What is the minimum distance required to get a clear photograph of an object using your mobile camera?
7. Out of  groups, which group requires least time to pronounce all the five alphabets in the group?
8. Write the name of three birds that lay eggs on ground.
9. What similarity is seen in a display board of Xerox shop and vehicle on hire?
10. What is the difference observed in pulse of a five year kid and a 70 years old person?

Q.2   State and Explain - true or false (Marks 10)
1. We use only 55 numbers in the first ten tables.
2. All the bananas in a bunch ripe together.
3. If any even number is divisible by 9 it is also divisible by 6.
4. When dysentery starts as a first aid, we should take a tablet to stop loose motions.
5. Rain water is always pure.
6. Vegetable ghee is produce of some plants.
7. All rivers in India flow from up to down.
8. Radio waves are discovered by Marconi.
9. Sabja and Tulsi are from the same family.
10. Welcro was invented from the thorns of porcupine.

Q.3 Answer in brief (Marks 10)
1. What information do we get on dialing *#06# on a mobile?
2. Which vitamin we get in excess to our daily requirement from 100 grams of egg?
3. Vehicles with number plate beginning with PY are registered with which part of India?
4. What chemical is produced in the body of a mother when she feels a great affection towards her kid?
5. Iodine as related with goiter, so selenium is related to?
6. We get picture of bone using X-ray, which technique gives us a picture of soft tissues?
7. Which symbol is printed on the plastic container used for food products?
8. Which two currents from the South American sea affect the Indian rains?
9. What tests of blood are done before accepting blood from a donor?
10. Who is the first Indian author to write on a topic of plant Ayurveda?

Q.4 – write scientific reasons (Marks 20)
1. We can’t use the lightening in the sky for domestic as well as for industrial use.
2. Food is deep fried in Ashadh, roasted in Shravan and steam cooked in Bhadrapada.
3. Trees that grow in the areas of short rain have small sized leaves.
4. Black color is really not a color
5. We should not have a meal while watching television
6. Ointments used for headache contain a medicine that is inflammatory.
7. Iron gets rusted fast in Mumbai than in Nagpur.
8. While frying vegetable, mustard seeds should pop up in the oil.
9. For every place in Maharashtra there are only two days in a year, when the sun is exactly on top of the head.
10. In a mobile camera the distance between lens and inner screen is very short.

Q.5 Identify who am I? (Marks 10)
1. I was the first president of Indian atomic energy commission established in 1948
2. We have the sun always rising in the west.
3. I am very precious glass cutter.
4. Rain does not fall on land along a line joining me and the South Pole.
5. I was born in 2nd century A.D. in India and I gave theory of atoms.
6. I look same in shape, though you may see me from any angle.
7. I may be Pandharpuri, Nagpuri or Surati I like resting in mud.
8. Our existence was predicted 100 years back but is proved in this year.
9. I supply energy to your body; you get me from your mother.
10. TalArjun and Sal all are my types.

Q. 6 Answer in details (Marks 15)
1. Which chemicals are used in a quality detergent powder, and for what functions?
2.  In a 50 over cricket match what maximum number of runs can a batsman score without getting out?
3. What are the problems that would arise using remotely driven vehicles?
4. 300 million years back the earth’s atmosphere had 35% oxygen. Write 5 differences between living beings now and then.
5. What is meant by centre of an earthquake? How is it decided?

Q.7 Plan / perform following experiments – (Marks 15)
1. Design an experiment to check how the babies hatched from the eggs recognize their mother?
2. Draw the angel of 273O without lifting ‘D’ angel measurer from the paper. Write geometrical proof for it.
3. Try growing wheat using sugar as a fertilizer. Observe it for 10 days. Write your observations and conclusion in details.

Q.8 Answer by drawing a diagram / figure - (Marks 15)
1. Show the north and south poles of magnets of different shapes like bar, bangle and sphere.
2. Draw a square ABCD with diagonal BD. Draw only three quarter length of another diagonal from point A to E. Draw a line going through E that goes parallel to diagonal BD and meets two sides at points F and G. from the same point E draw a line parallel to DC, that cuts the first diagonal at H. Draw perpendiculars from points F and G to first diagonal. Write the types geometrical figures with their numbers you observe in the figure?

3. Three groups are to start their journey by cars from three different places namely Dhulia, Ratnagiri and Washim. They have to follow certain rules and visit maximum numbers of cities in Maharashtra. Rules - 1) They should not stop unless they travel at least 100 Km, 2) they should change their direction and take a right angle turn within each 100 to 150 Kms during the travel, 3) they can travel maximum up to 5000 Kms. Draw the route taken by each of the groups taken to visit maximum number of cities in Maharashtra.

.    विज्ञान रंजन स्पर्धा अगस्त २०१६    .

 यह स्पर्धा सबके लिए खुली है  प्रवेशमूल्य नही ० प्रश्नोंके उत्तरे स्वत: विचार करके, किसीसेभी पुछकर, पुस्तकमें देखकरप्रत्यक्ष प्रयोग करके पा सकते है  प्राथमिक फेरीके विजेताओंके नामों की घोषणा अक्तूबर २०१६ को पुणेमें की जाएगी  प्राथमिक विजेताओंको प्रात्यक्षिक प्रयोगपर आधारित अंतिम परिक्षा अक्तुबर माहमें पुणेमें देनी होगी  अंतिम परिक्षामें उत्तीर्ण होनेवाले विजेता आकर्षक इनाम के पात्र होंगे  आपके उत्तर फूलस्कैप आकाराके कागजपर अपने हाथोंसे लिखकर ३० सितम्बर २०१६ तक भेंजे  अपनी उत्तरपत्रिका के साथ निम्नसूचित जानकारी लिखकर भेजे
.
पूरा नाम २पता ३दूरध्वनी/भ्रमणध्वनी क्रमांक विपत्ता (ईमेलजन्मदिनांक ६शिक्षा ७व्यवसाय ८. बढाई गुण
बढ़ाई गुण शैक्षिक पात्रता और उम्र के अनुसार स्पर्धकोंको नीचे कंसमें छपे गुण बोनस स्वरूप दिये जाएंगे.
शिक्षा: पाचवी तक (१०)सातवी तक ()दसवी तक ()बारहवी तक ()शास्त्रशाखेतर पदवीधर (), शास्त्र पदवीधर (0).
उम्र वर्ष: १२ तक ()१३ से १६ ()१७ से २० ()२१ से ४० (), ४१ से ६० (), ६१ से ८० ()८१ से जादा ().

उत्तरपत्रिका भेजने का पतामराठी विज्ञान परिषदपुणे विभागतिलक स्मारक मंदिरतिलक रास्तापुणे ४११०३०

प्रश्नपत्रिका

प्रश्न १ - निरीक्षण कर के उत्तरे दे  (गुण १०)
१.    घरमें सबसे अधिक प्रयोग किया जानेवाला बिजलीपर चलनेवाला उपकरण कौनसा है?
२.    लाल गुलाब के फूलमें कितनी पंखुडिया होती है?
३.    १०० रुपये के नोट की अगली और पिछली बाजू की पहचान आँख बंद कर के कैसे करेंगे?
४.    19 से 25 सितम्बर के बीच आपके   गाँवसे दिखनेवाले सूर्योदय और सूर्यास्त के समयमे क्या अंतर था?
५.    ५ मिनिट जलनेपर मोमबत्ती का वजन कितना घटता है?
६.    किसी मोबाईल के कैमेरेसे कमसकम कितने अंतरपर रखी वस्तू की फोटो स्पष्ट निकलती है?
७.    क, च, ट, त, प इन पांच वर्ण के पांचो अक्षर बोलनेमें सबसे कम समय किस वर्णको लगता है?
८.    जमिनीपर अंडे देनेवाले तीन पंछियोंके नाम लिखो.
९.    झैराक्स की बोर्ड और किराये का प्रवासी वाहन इनमे क्या समानता है?
१०.     पाँच सालका बच्चा और सत्तर सालकी व्यक्ती इनकी नाडीमें क्या अंतर होता है?

प्रश्न २ – सही या गलत स्पष्ट करो   (गुण १०)
१.    १से१० की सारणीमें ५५ संख्याओंका प्रयोग होता है.
२.    केलेके गुच्छमें सब केले एक साथ पकते है
३.    सम संख्या ९से विभाज्य हो तो ६सेभी विभाज्य है.
४.    हैजा हो तो सबसे पहले जुलाब बंद होनेकी दवा ले.
५.    बरसात का पानी हमेशा शुद्धही होता है.
६.    वनस्पती तूप वनस्पतींमें बनता है.
७.    भारतमें सब नदियाँ उपरसे नीचे बहती है.
८.    रेडीओ तरंग की खोज मार्कोनीने की.
९.    सब्जा और तुलसी एकही कुलके है.
१०.     वेल्क्रोका आविष्कार साहीके काँटोसे प्रेरीत हुआ है.

प्रश्न ३ – चंद शब्दोमें उत्तर दे  (गुण १०)
१.    मोबाईलसे *#06# क्रमांक डायल करनेपर कौनसी सूचना मिलती है?
२.    १०० ग्रॅम अंडे खानेसे अपनी रोज की जरूरतसे ज्यादा मिलनेवाला जीवनसत्व कौनसा है?
३.    PY अक्षरसे शुरू होनेवाले वाहन भारतके कौनसे राज्यमें पंजीत हुए होते है?
४.    किसी माँ को शिशु के प्रती प्रेम की प्रबल भावना निर्माण होती है तब उसके शरीरमें कौनसे रसायन का निर्माण होता है?
५.    आयोडीन से घेंगा तो सेलेनियम से क्या?
६.    क्षकिरणोंसे हड्डीका चित्र लेते है, शरीरके अंदरके मृदू भागोंका चित्र कौनसे तंत्रसे लेते है?
७.    खाने की चीजे रखनेके लिए प्रयोग किये जानेवाले प्लैस्टिकके डिब्बेपर कौनसा चिन्ह होता है?
८.    दक्षिण अमरिका के समुद्रमें पैदा होनेवाले कौनसे दो प्रवाह भारत की बारीशपर प्रभाव करते है?
९.    रक्त लेनेसे पहले रक्तदाताकी कौनसी जाँच होती है?
१०.  वृक्ष आयुर्वेद विषयपर भारतमें सबसे पहले ग्रंथ लिखनेवाला कृषीतज्ज्ञ कौन है?

प्रश्न ४ - वैज्ञानिक कारण लिखो  (गुण २०)
१.    आकाशामें चमकनेवाली बिजली औद्योगिक या घरेलु कामों के लिए इस्तेमालमें नही आ सकती.
२.    आषाढ तलनेका, श्रावण भूननेका तो भाद्रपद खदबदानेका महिना है.
३.    कम बारीशवाले प्रदेशोंमें पेडोंके पत्ते छोटे होते है.
४.    काला रंग वास्तवमें कोई रंगही नही है.
५.    टिव्ही देखते समय खाना नही खाना चाहियें.
६.    सरदर्द मिटानेमें प्रयोग किये जानेवाली दवामें जलन करनेवाला रसायन जरूर होता है.
७.    नागपूरमें नहीं मुंबईमें लोहा जल्द जंग पकडता है.
८.    तडका देते समय राई की तडतड आवाज आनी जरूरी होती है. 
९.    महाराष्ट्र के गाँवोंमें सूर्य एकदम माथेपर हो ऐसे सालमें केवल दो दिनही होते है.
१०.     मोबाईल कैमेरेके ताल व परदेमें कम अंतर होता है.

प्रश्न ५ – नीचे दिए वाक्योंमें ‘मैं’ कौन है? (गुण १०)
१.    १९४८ में स्थापित भारतीय परमाणु ऊर्जा आयोग का पहला अध्यक्ष मुझे नियुक्त किया गया.
२.    हमारे यहाँ सूरज हमेशा पश्चिममें उगता है.
३.    मैं काँच काट सकता हूँ और बहुत मूल्यवान हूँ.
४.    मेरे स्थानसे दक्षिण ध्रुवतक की सीधी दिशामें कही भी जमीनपर बारीश नही होती.
५.    मै इसापूर्व दूसरी शतीमें भारतमें पैदा हुआ. मैनें अणू संकल्पना के सिद्धांत की चर्चा की.
६.    किसीभी बाजूसे देखो मैं वैसाही दिखाई देता हूँ.
७.    मैं पंढरपुरी रहू नागपुरी या सुरती मुझे किचडमें बैठनेमें बडा मजा आता हैं.
८.    हमारे अस्तित्व की भविष्यवाणी सौ साल पहले हुई थी पर इस वर्ष हमारे होनेका प्रमाण मिला. 
९.    शरीरमें ऊर्जा पैदा करती हूँ, माँ से ही मिलती हूँ.
१०.     ताल अर्जुन साल यह सभी मेरे प्रकार है.

प्रश्न ६ - सविस्तर उत्तरे लिहा -  गुण १५
१.      उत्तम नमुने की धुलाई की पाउडरमें कौनकौनसे रसायन होते है? वह किस काममें आते हैं?
२.      ५० षटकोंके क्रिकेट खेलमें कोई फलंदाज नाबाद रहते हुए अधिकतम कितनी दौडें बना सकता है?
३.      चालकविहीन वाहनोंसे क्या जोखीम हो सकेगी?
४.      ३० करोड साल पहले हवामें ३५% ऑक्सिजन होता था. उन दिनोंमें होनेवाले जीव और आजके जीव इनमें कौनसे पाँच फरक हो सकते है?
५.      भूकम्प का केंद्र किसे कहते है? उसका स्थान कैसे निश्चित करते है?

प्रश्न ७ - प्रयोग करो / रचना करो  (गुण १५)
१.      अंडेसे बाहर आनेपर शावक अपनी माँ को कैसे पहचानता होगा इसका अनुमान लगाने के लिए वैज्ञानिक प्रयोग की रचना क्या हो सकती है?
२.      कोण नापनेवाला यंत्र कागजपर रखके हाथ न उठाते हुए २७३का कोन बनाओ. भूमितीय सिद्धता लिखो.
३.      गेहूँ अंकूरण के लिए शक्कर खाद रूपमें उपयोगमें लाएँ तो १० दिनोंमें कौनसा फरक दिखेगा? प्रयोग करे. अपने निष्कर्ष विस्तारसे लिखें.

प्रश्न ८ – चित्र निकालकर उत्तर दे  (गुण १५)    
१.      डंडी, चुडी, गोला इस आकारके चुंबक के उत्तर और दक्षिण ध्रुव चित्र निकालकर उसमें दिखाओ.
२.      ABCD चौकोर तथा उसका कर्ण BD निकालो. दूसरा कर्ण पौने आकार का AE निकालो. E बिंदूमेसे दोन भूजाओंतक जानेवाली, पहले कर्ण को समांतर रेखा FG निकालो. उसी बिंदूसे DC भूजा को समांतर रेखा पहले कर्ण को H पर जूडे ऐसी निकालो. और बिंदूंओंसे पहले कर्णपर लंब निकालो. अब बने चित्रमें कौनकौनसी और कितनी ज्यामितीय आकृती दिखती है यह लिखो.
३.      धुलिया, रत्नागिरी और वाशिम इन गावोंमेंसे तीन गुट गाड़ीयोंमें एकही समयपर यात्रापे निकलें. उन्हे कुछ शर्तों के आधारपर महाराष्ट्र के अधिकतम शहरोंमेंसे जाना था. १) यात्रा शुरू करनेके बाद १०० किमी के पहले रुकना नही. २) १०० से १५० किमी के बीच अपनी दिशा सही कोणमें बदलनी होगी. ३) ५००० किमी की यात्रा करनी है. सभी गुटों की यात्रा का मार्ग नक्शेपर  दिखाओ.


आहवान – खुद भाग ले. औरोंको प्रोत्साहन दे. प्रश्नावली का प्रचार व प्रसार करे. इनाम के लिए राशी दे. आपके मनमें ऐसे प्रश्न हो तो हमें भेजे. हमारा ब्लॉग देखे http://mavipapunevibhag.blogspot.in 
मराठी भाषा, विज्ञान और वैज्ञानिक दृष्टि बढानेमें अपना योगदान दे.
संपर्क: मराठी विज्ञान परिषदपुणे विभाग. टिलक स्मारक मंदिरटिलक रास्तापुणे ३०. 
संजय नाईक ९४२२५१९४२०