एका तापल्या
दुपारी, एक माळी आला दारी
दीनदलिताची शमवी तहान,
तो झाला
दीन-दलिताचा प्राण,
तो झाला दीन-दलिताचा प्राण
तो झाला
दीन-दलिताचा प्राण,
तो झाला दीन-दलिताचा प्राण || ध्रु. ||
तहानलेल्या हरिणाच्या कळपावाणी, जातीच्या वाळवंटी शोधायचं
पाणी
हीन दीन जन असे पाहूनी दिलदार माळी आला धावूनी
पाणी दिलं गार गार, जणू झाली जलधार, जरी विरोधात गेलं
गावठाण
तो झाला
दीन-दलिताचा प्राण,
तो झाला दीन-दलिताचा प्राण || 1 ||
बहिष्कारलं जरी तयाला जातीने, तरीही लढला सावित्रीच्या
साथीने
वाघ आणि वाघीणिची जोडी झाली, रुढीसवे लढावया पुढे आली
त्यांनी फोडली डरकाळी, कोल्हे कुई बंद केली, त्यांनी चुप
केलं भुकणारं श्वान
तो झाला
दीन-दलिताचा प्राण,
तो झाला दीन-दलिताचा प्राण || 2 ||
माता भगिनी ज्योतिबास वंदन करीती, शिकून घेती बसती
राजगादीवरती
प्रतापसिंगाची लेक म्हणे, माझा बाप हेच गाणं गुणगुणे
झालं हाकारून रान, म्हणे ज्योतिबा महान, त्यानं दिलं आम्हा
विद्येचं दान
तो झाला
दीन-दलिताचा प्राण,
तो झाला दीन-दलिताचा प्राण || 3 ||
(चाल – मुझे नींद ना आए, मुझे चैन ना आए....– चित्रपट – दिल)