To See विज्ञान रंजन स्पर्धा 2020 Click -
https://newsofmyinterest.blogspot.com/2020/01/vidnyan-ranjan-spardha-2020-2020.html
See English Translation at the bottom. You can translate the questions in your mother tongue and use those on Indian National Science Day i. e. 28 February 2018
https://newsofmyinterest.blogspot.com/2020/01/vidnyan-ranjan-spardha-2020-2020.html
See English Translation at the bottom. You can translate the questions in your mother tongue and use those on Indian National Science Day i. e. 28 February 2018
विज्ञान रंजन स्पर्धा 2018
प्रवेशमूल्य नाही आकर्षक बक्षिसे खालील प्रश्नांची उत्तरे स्वत:च्या मनाने / कोणालाही विचारून / इतरत्र शोधून
/ प्रत्यक्ष प्रयोग करून मिळविता येतील. * जमतील तेवढी उत्तरे फुलस्केप कागदावर लिहून 15 फेब्रुवारी 2018 पर्यंत मराठी विज्ञान
परिषद, पुणे विभाग. टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता, पुणे 411030 येथे पोचवावीत प्राथमिक विजेत्यांची नावे 28 फेब्रुवारी या राष्ट्रीय विज्ञान दिनी जाहीर केली जातील. परीक्षकांचा
निर्णय अंतिम राहील. प्राथमिक
विजेत्यांची अंतिम फेरी 4 मार्च 2018 रोजी पुणे येथे होईल. अंतिम फेरी प्रात्यक्षिक
प्रयोगांची असेल.
शैक्षणिक पात्रता आणि वय लक्षात घेऊन स्पर्धकांना कंसात लिहील्याप्रमाणे पुढावा गुण देण्यात येतील.
शिक्षण: पाचवीपर्यंत(10), सातवीपर्यंत (9), दहावीपर्यंत (7), बारावीपर्यंत* (5), पदवीपर्यंत* (3), *शास्त्र-शाखा असल्यास
(0)
वय वर्षे: 13पर्यंत (6), 14 ते 16 (4), 17 ते 20 (2), 21 ते 40 (0), 41 ते 60 (2), 61 ते 80 (4), 81च्यावर (6).
आपल्या उत्तरपत्रिकेसोबत पुढील माहिती लिहून पाठवावी -
1. संपूर्ण
नाव, 2. पत्ता (पिनकोडसह),
3. संपर्कासाठी दूरध्वनी / भ्रमणभाष, 4. ई-मेल
5. जन्मतारीख, 6. शिक्षण, 7. व्यवसाय, 8. पुढावा गुण –शिक्षणानुसार +
वयानुसार (वरील नियम पहा)
प्रश्नावली
प्र. 1 – निरीक्षण करून उत्तरे
द्या. (गुण 10)
1) यंदाच्या कॅलेंडरमध्ये
पौर्णिमा नसलेला महिना --
2) बॅडमिंटनच्या फुलाला किती
पिसे असतात ?
3) महाराष्ट्रात
सर्वात पश्चिमेकडचे ठिकाण कोणते ?
4) गजराच्या घड्याळात
जास्तीत जास्त किती वेळापूर्वीचा गजर लावता येतो?
5) किती जणांचे
डावे पाऊल उजव्यापेक्षा मोठे असते? (किमान 10
जणांच्या पावलांची मापने करा.)
6) संगणकाच्या कळफलकावर
स्पर्शाने ओळखता येणाऱ्या कळा कोणत्या असतात?
7) टिव्ही पडद्यावर
मध्येच कसला आकडा दिसतो ?
8) तुमच्या घरात सर्वात
जास्त वीज वापरणारे उपकरण कोणते? ते ताशी किती
वीज वापरते ?
9) मीठ आणि खाण्याचा सोडा
एकत्र कालवल्यावर येणारा वास कशासारखा असतो ?
10) सारख्या आकाराचे आयत
एकावर एक ठेवले की कोणता आकार होतो?
प्र. 2 – खालील
विधानांमधील मी कोण? (गुण 10)
1) फक्त शनिलाच
कडी नाहीत, मलाही आहेत.
2) माझ्यावरून
टाकलेले पाऊल उत्तरेकडेच पडते.
3) मी जगाला संगणकाच्या
खिडक्या उघडून दिल्या.
4) माझे अभ्यासाचे
विषय वारा, ढग, वाफ, ऊन...
5) अनेक
पुरुषांच्या नावात मी असतो, गिरला राहतो
6) तीघींत मी
लहान, फेकल्यावर खाली पडताना
त्या दोघींपैकीच एक जमिनीवर पडते, मी क्वचितच.
7) माझ्याशी
संबंधित शब्द रॅम, रॉम, वॅन, लॅन.
8) तलवारबाजीत
माझे नाक कापले गेल्याने मी चांदीचे टोपण नाक बसवून घेतले - खगोलशास्त्रज्ञ
9) जगज्जेत्या गो
खेळाडूंना मी गेली दोन वर्षे हरवले
10) दाब वाढो वा कमी होवो, समुद्रसपाटीला असो वा पर्वतावर माझे मापन शून्य सेल्सिअसच होते.
प्र. 3 – चौथ्या जागी कोण? स्पष्ट करा – (गुण 20)
1)
अंडे, अळी, कोश, ....
2)
8, 13, 21,
...
3) शुक्र, पृथ्वी, मंगळ, ....
4) बिंदू, रेषाखंड, किरण, ....
5) अणू, केंद्रक, प्रोटॉन, ......
6) कापूस, पेळू, सूत, ...
7) ङ, ञ, ण, ....
8) युरेनियम, नेपच्यूनियम, प्लुटोनियम, ....
9) गुरुत्वाकर्षण, विद्युतचुंबकीय, प्रबलबल, ....
10) गॅलिलिओ, न्यूटन, आईनस्टाईन, ....
प्र. 4 – शास्त्रीय
कारणे लिहा. (गुण 20)
1) पाण्यापेक्षा बर्फ हलका
असतो.
2) मिरचीने होणारी जिभेची
आग दुधा-तुपाने थांबते.
3) भिती वाटली की 'बाप रे!, आणि ठेच लागल्यावर 'आई ग' असे उद्गार तोंडातून
निघतात.
4) बिबटे मानवी
वस्तीत येण्याचे प्रमाण वाढले आहे.
5) नाकात मेकडे होतात.
6) पाईनसारखे मोठे वृक्ष
असणाऱ्या जंगलांना वणवे लागणे आवश्यक असते.
7) बाजारातून
आणलेले जनावर तीन दिवस वेगळे ठेवण्याची प्रथा काही
आदिवासींमध्ये आहे.
8) औषधाच्या कॅप्स्यूलच्या
आकाराचे नाव काय? तो तसाच का
असतो ?
9) मोबाईल फोन
व्हायब्रेट होतो.
10) सायकलपटू लायक्रा
प्रकारची चड्डी वापरतात.
प्र. 5 – सविस्तर उत्तरे लिहा. (गुण 15)
1)
तुषार सिंचन व ठिबक सिंचन यांची तुलना करा.
2)
धूरके, आम्लपर्जन्य
आणि हरितगृहवायू आणि वाहतूक यांचा कोणता संबंध आहे?
3)
भारतीतल कोणत्या नद्या पाण्याची आयात करतात? कोणत्या
निर्यात?
4)
रोगजंतूंची औषधविरोधी ताकद वाढू नये म्हणून कोणकोणत्या गोष्टी कराव्यात ?
5)
शरीरात रक्त कसे तयार होते?
प्र. 6 – थोडक्यात उत्तरे लिहा. (गुण 10)
1) एका शब्दाने
व्यक्त होणारे 5 अपूर्णांक
लिहा?
2) चोंदलेले नाक मोकळे
करण्यासाठीचे प्रभावी उपाय.
3) वनस्पती सूर्यप्रकाशात
अन्न तयार कसे करतात ?
4) क्रिकेटमध्ये फलंदाजापासून
सर्वात जवळ आणि सर्वात दूर असणारा सीमारेषेवरचा बिंदू कोणता?
5) 1 4 14 64 144 यातला उपरा आकडा स्पष्ट करा
6) एका शाळेत न
चुकता बोर्डाच्या पासाच्या निम्मे टक्केच विद्यार्थी
पास होतात. एका वर्षी शाळेचा
आणि बोर्डाचा निकाल सारखाच लागला. कसा ?
7) देवणी, कंधारी, डांगी, खिलारी यांच्यापैकी कोणती गाय पूर्ण पांढरी असते? कोणती लाल?
8) सुर्यमालेबाहेर
शोधला गेलेला पहिला ग्रह कोणता? त्याच्या
सूर्याचे नाव काय?
9) भोवरा फिरता
राहण्यासाठी त्याच्या एका मिनिटात किती गिरक्या होतात, ते कसे मोजणार ?
10) फुंकरीने
विझवूनही पेटणाऱ्या मेणबत्तीचे रहस्य काय ?
प्र. 7 – अनेक उत्तरे द्या. (गुण 15)
1)
1 ते 5 अंक एकेकदा वापरायचे आणि 'कंचेभागुबेव' नियमानुसार उत्तर 99 येईल अशी मांडणी अनेक प्रकारे
करा.
2)
बुद्धिबळाच्या पटावर एक उंट सगळ्या घरांतून जाऊन आला तर त्याचा मार्ग कसा असेल? (किमान वळणाचा, कमाल वळणाचा)
3)
समान आकाराचे दोन, तीन, चार, पाच, सहा काटकोन त्रिकोण घेऊन होणाऱ्या भौमितिक रचना
कोणत्या? आकृत्या काढून
स्पष्ट करा.
4)
एक काचेचा पेला पाण्याने भरा. छापील इंग्रजी मजकूर असलेला कागद त्याच्यामागे धरून पहा. कोणकोणते
शब्द, अक्षरे सुलट
दिसतात?
प्र. 8 – नाट्य प्रसंग लिहा – (गुण 15)
एका संशोधक/वैज्ञानिक असणाऱ्या व्यक्तिच्या मनात नव्या कल्पनेची अंधूक
जाणीव होत आहे. तुम्ही त्या व्यक्तिची जवळची व्यक्ती आहात. ती नवी कल्पना नीट
जोपासली जावी, खरी ठरावी या काळजीने संशोधक/वैज्ञानिकाशी
संवाद करत आहात - अशी कल्पना करून एक नाट्य प्रवेश लिहून काढा. (दोन ते तीन पाने)
विज्ञान रंजन स्पर्धा – विज्ञानाचा
शोध घेण्यासाठी एक संधी आहे. स्वत: भाग घ्या, इतरांना
भाग घ्यायला सांगा, या प्रश्नावलीच्या प्रती काढून वाटा. उत्तरांबद्दल इतरांशी चर्चा
करा. विज्ञान प्रयोगाने, विचाराने, चर्चेने वाढते.
चांगली उत्तरे
देणाऱ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देणार आहोत * त्यासाठी तुम्हीही आर्थिक मदत करू
शकता *
संपर्क करा –
मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग, विनय र. र. 9422048967 संजय मा. क. 9552526909
Marathi Vidnyan Parishad, Pune Vibhag.
We are an organization working in the field of popularization of science in Marathi language. We do work with students and teachers of schools and colleges. Organize science clubs, practical courses, seminars, lectures, film shows, science quizzes; publish booklets on various science subjects, visits and tours to places of scientific importance. We found that it is necessary to involve every strata of our society in developing scientific attitude. So we take number of prominent scientists and promising researchers to the society in large and have their inter actions and develop knowledge.
One of our programs – विज्ञान रंजन स्पर्धा – Vidnyan Ranjan Spardha, is an effort to involve every member of our society, child or adult, highly learned or not so, male or female, rural or urban – in developing their abilities of thinking scientifically.
This is an open book type of test. Open to all with no bar of age, sex, educational qualifications. We supply the questioner. We ask individuals to participate in the competition by sending their hand written answers to the questions in the questioner by 15th February. Our expert team of judges goes through the answer papers. Check the answers to find out who have innovative and creative answers. On 28th February – Indian National science day we declare prize winners and distribute the prizes in a special function in month of March.
. You may go through the attached questioner of Vidnyan Ranjan Spardha 2018. Hope you will appreciate our efforts in promoting scientific awareness in our society.
I request you to contribute in this effort by donating any amount you find suitable for the purpose. This year we expect around 5000 participants and the expenditure of the task will approximately be Rupees 2.5 lakhs, which includes amount of Prizes – in cash and kind, publicity, assessment, prize distribution program and other expenses.
Waiting for your response,
Thanking you.
With regards,
Vinay R R
President, Marathi Vidnyan Parishad, Pune Vibhag.
Tilak Smarak Mandir, Tilak road,
Pune 411030
mavipa.pune@gmail.com
Blog http://mavipapunevibhag.blogspot.in
Vidnyan Ranjan
Competition 2018 विज्ञान
रंजन स्पर्धा 2018.
* No entrance fee. * Attractive
prizes. * You can find the answers to the questions given below, on your own,
or by asking anyone, or by searching anywhere or performing the experiments
yourself. * Answer as many questions as you can on a foolscap paper. * Send
your hand written answers in Marathi to Marathi Vidnyan Parishad, Pune
Vibhag, Tilak Smarak Mandir, Tilak Road, Pune 411030 before 15th February 2018. * You
may use technical terms in English if unavoidable.* Winners of the preliminary
round will be announced on National Science Day i.e. 28th February
2018. * Decisions of the judges will be considered final. *Final round will be
held on 4th March 2018 in Pune. *The final round shall consist
of practical experiments. *Scores will be normalized across age groups and
educational qualifications by giving bonus points according to the following
By Age
Group- Up to 13 years
(6), 14 to 16 (4), 17 to 20 (2), 21 to 40 (0), 41 to 60 (2), 61 to 80 (4),
Beyond 81 years (6)
By
Educational Qualification- Up to V Std. (10), Up to VII Std. (9), Up to X std. (7), Up to XII Std.
(5), Graduate (3) XII or higher (Science Branch) (0)
Send your responses in Marathi along with the following
information -
1. Full Name.
2. Address with PIN Code. 3. Telephone / Mobile Number.
4. E-Mail ID. 5. Date of Birth. 6. Educational Qualification. 7.
Occupation. 8. Bonus
Points (Refer above)
----------------------------------------------------------------------------------
Questioner
Q1. Answer the following on the basis of observations. (10
points):
1. Which
month in this year’s calendar does not have a full moon day?
2. How many
feathers does a badminton shuttle-cock have?
3. Which
is the westernmost point in Maharashtra state?
4. What
is the maximum duration of time for which you can set an alarm in an alarm
clock?
5. Measure
the feet of at least ten people and tell how many people have a longer left
foot.
6. Which
keys on a computer keyboard can be identified just by touch?
7. Sometimes
a strange number is seen on the TV screen. What is it?
8. Which
is the most electricity consuming appliance in your home? How many units per
hour does it consume?
9. Describe
the smell that you get when you mix salt and baking soda together.
10.If you
keep rectangles of the same size one on top of another, what shape do you get?
Q2. Identify “Who Am I?” in the Following Statements (10 points):
1. Not only
Saturn, I too have rings.
2. Any
step taken from me is towards the North.
3. I
opened the windows of the computer for the world.
4. I
study wind, clouds, vapour, sunshine etc.
5. I
am present in the name of many men in India. Gir is my last resort.
6. I
am the smallest among the three of us. When tossed one of the two touches
ground I seldom.
7. RAM,
ROM, WAN, LAN - are some words associated with me.
8. I
am an astronomer who lost his nose in a sword fight, and fitted a silver nose
in its place.
9. I
have beaten the world champion Go players for the last two years in a row.
10. Irrespective
of pressure and altitude, I always measure zero degrees Celsius.
Q3. Given below are three related things. Fill in the fourth. (20
points):
1. Egg,
Larva, Pupa, ___
2. 8,
13, 21, ___
3. Venus,
Earth, Mars, ___
4. Point,
Segment, Ray, ___
5. Atom,
Nucleus, Proton, ___
6. Cotton,
Sliver, Yarn, ___
7. ङ, ञ, ण, ___
8. Uranium,
Neptunium, Plutonium, ___
9. Gravitational,
Electro-magnetic, Strong force, __
10. Galileo,
Newton, Einstein, ___
Q4. Give Scientific Reasons. (20 marks):
1. Ice
is lighter than water.
2. The
burning sensation on the tongue caused by chilli can be stopped by milk or
ghee.
3. We
reflexively say “बाप रे” when afraid and "आई गं” when suddenly injured.
4. The
instances of leopards entering human settlements have increased.
5. There
are boogers in the nose.
6. For
forests with large trees like pines, fires are essential.
7. In
some tribes, cattle
bought from the market is kept in a separate enclosure for three days.
8. Name
the shape of the medicine capsule. Why the capsules are shaped so?
9. Why
do mobile phones vibrate?
10.Cyclist
sportspersons wear leggings made from Lycra
Q5. Give detailed answers. (15 points)
1. Compare
sprinkle irrigation and drip irrigation.
2. How
are smog, acid rain and greenhouse gases related to transport?
3. Which
rivers in India import water? Which of them export?
4. What
measures should be taken to prevent bacteria from becoming resistant to
antibiotics?
5. How
is blood formed in the body?
Q6. Answer in short (10 points)
1. Write
five fractions that can be expressed in a single Marathi word.
2. What
is an effective remedy for clearing a blocked nose?
3. How
do plants make food in sunlight?
4. On
the cricket field, which are the points on the boundary closest to and farthest
from the batsman?
5. Which
is the odd number among these – 1, 4, 14, 64, 144?
6. There
is a school where the percentage students passing in the 10th standard
board exam is always the half of the overall passing percentage of the board exam.
One year however, the passing percentage of the school as well as the board
turned out to be the same. How is this possible?
7. Among
the ‘Devani देवणी’, ‘Khilari खिलारी’, ‘Dangi डांगी’ and ‘Kandhari कंधारी’ breeds
of cow, which cow is all white in colour and which is all red?
8. What
is the name of the first planet discovered outside our solar system? What is
the name of its sun?
9. How
many rotations per minute does a top require to stay spinning upright? How do
you measure those rotations? How do you count the number of rotations per
minute that keep a top spinning upright?
10. What
is the secret of the trick candle which stays burning even if you blow it?
Q7. Write Multiple Answers (16 points)
1. Using
the numbers from 1 to 5, each only once and the BODMAS rule, write multiple
arithmetic expressions which evaluate to 99.
2. On the
chessboard, if the bishop visits each square once, what will its route be?
(With least turns and most turns.)
3. Which
geometric figures can be drawn using 2, 3, 4, 5 and 6 right angled triangles of
equal size? Show with constructions / diagrams.
4. Fill
a glass with water to the brim. Place a paper with printed English text behind
it and try to read. Which letters / words do not appear inverted?
Q8. Write a Drama Scene (15 points)
A person who is scientist or
researcher has formed the seed of a new idea in his/her mind. You are close to
this person and are having a conversation with the scientist / researcher so
that the idea is developed well and proven correct. Imagine this situation and
write a drama scene (2 to 3 pages).
You can discuss your
answers with others. Science progresses by experiment and discussion
There
are encouragement prizes for good answers. Help us
financially for the same.
Marathi Vidnyan Parishad,
Pune Vibhag, Vinay 9422048967, Sanjay 9552526909
Vidnyan Ranjan Spardha 2018 - http://mavipapunevibhag.blogspot.com/2018/01/vidnyan-ranjan-spardha-2018-2018.html