Wednesday, January 29, 2020

Vidnyan Ranjan Spardha 2020, विज्ञान रंजन स्पर्धा 2020

*विज्ञान रंजन स्पर्धा 2020*
सूचनाg प्रवेशमूल्य नाही g वयाची अट नाही g शिक्षणाची अट नाही g खालील प्रश्नांची उत्तरे स्वत:च्या मनानेकोणालाही विचारूनइतरत्र शोधूनप्रत्यक्ष प्रयोग करून मिळविता येतील g उत्तरे फुलस्केपकागदावरलिहून 15 फेब्रुवारी 2020 पर्यंतमराठी विज्ञान परिषद पुणे विभाग,टिळक स्मारक मंदिर,टिळक रस्ता,पुणे 411030 येथे पोचवावीत g प्राथमिक विजेत्यांची नावे 20 फेब्रुवारीला जाहीर केलीजातीलg प्राथमिक विजेत्यांची अंतिम प्रयोग फेरी 1 मार्च रोजी पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथे होईल g आकर्षक बक्षिसे gपरीक्षकांचा निर्णय अंतिम राहील g आपल्या उत्तरपत्रिकेसोबत पुढील माहिती लिहून पाठवावी 1. संपूर्ण नाव2. पत्ता, 3. संपर्कासाठी दूरध्वनी / भ्रमणभाष, 4. ई-मेल. 5. जन्मतारीख, 6. शिक्षण, 7. व्यवसाय, 8. पुढावा गुण (खाली पहा) –
g शैक्षणिक पात्रता आणि वय लक्षात घेऊन स्पर्धकांना कंसात लिहील्याप्रमाणे पुढावा गुण देण्यात येतील.
शिक्षण:पाचवीपर्यंत(10) सातवीपर्यंत (9) दहावीपर्यंत (7) बारावीपर्यंत (5) पदवीपर्यंत (3) शास्त्र-शाखा असल्यास (0)
वय वर्षे:13पर्यंत (6), 14 ते 16 (4), 17 ते 20 (2), 21 ते 40 (0), 41 ते 60 (2) ,61 ते 80 (4), 81च्यावर (6)
अधिक माहितीसाठी संपर्क – शशी भाटे – 9420732852, संजय मा. क. 9552526909, विनय र. र. 9422048967
विज्ञान रंजन 2020 प्रश्नावली
प्रश्न १ - निरीक्षण करून उत्तर द्या (गुण १०)
१)10 रूपयाच्या नाण्याचे वजन किती?
२) 2011ची 100 रुपयांची नोट आणि 2018ची 100 रुपयांची नोट यात कोणकोणते फरक आहेत?
३) उजवा हात टेबलावर ठेवून मधले बोट मुडपून अंगठ्याकडून करंगळीपर्यंत एकावेळी एक बोट उचला. काय होते?
४) कॅलेंडरमध्ये एका महिन्यात एकच वार पाच वेळा येत असेल तर त्याच्या दिनांकाची बेरीज किती असेल?
५) ठोकळ्याच्या फाश्यावर विरूद्ध बाजूंवर असणाऱ्या ठिपक्यांची बेरीज किती असते?
६) तुम्हाला कसली तरी हुरहूर वाटते तेव्हा तुमच्या शरीरावर कोणते परिणाम होतात?
७) दुरेघीत लिहीताना देवनागरी लिपीतील कोणती अक्षरे रेघेबाहेर लिहावी लागतात?
८) भारताच्या नकाशात चेन्नई-मुंबई- आणि चेन्नई-कोलकता जोडणाऱ्या दोन रेषांमध्ये किती अंशाचा कोन होतो?
९) महाराष्ट्राच्या नकाशात सर्वात पूर्वेकडे असणारे समुद्रकिनाऱ्यावरील ठिकाण कोणते?
१०)सोबतच्या चित्रात कोणकोणत्या आणि किती भौमितिक आकृत्या दिसतात?

 प्रश्न २ - मी/आम्ही कोण? (गुण १०)
१) आम्हाला इस्रायलने यानातून चंद्रावर प्रयोगासाठी नेलेआम्ही अष्टपाद आहोत.
२) माझ्यात पृथ्वीवरचे 75% ज्वालामुखी आणि 90% भूकंपकेंद्रे सामावली आहेत.
३) मी पृथ्वीवरची सर्वात मोठी नदी आहे.
४) सस्तन प्राण्यांमध्ये माझे डोळे सर्वात मोठे असतात.
५) भारतातल्या नोबेल पारितोषिक विजेत्या नऊ  व्यक्तींपैकी पाच व्यक्तींचे मूळ गाव मी आहे.
६) आम्ही मानवी शरीरात असतो कान-नाक-डोळे इत्यादींकडून मिळालेली माहिती मेंदूकडे पोचवतो.
७) मी एक भीतीचा प्रकार आहेज्यामुळे लोकांना ज्यांत अनेक छोटी छोटी भोके आहेत अशा पदार्थांची भीती वाटते.
८) चीनमधील वुहान शहरात मी आढळलो. शहर सर्व बाजूंनी कडेकोट बंद केले तरी माझा प्रसार झालाच.
९) इव्हान इव्हानोवीच रशियन अवकाशयानातून फिरून आला त्याच्यासारखीच मी भारतीय अवकाशयानातून फिरून येणार
१०) माझ्या डोळ्याला तीन पापण्या असतात आणि तिन्ही बंद असल्या तरी मला दिसते.


प्रश्न ३ - थोडक्यात उत्तर द्या – (गुण १०)
१) मानवकपी व गिनी पिग वगळता बहुतेक सर्व सस्तन प्राण्यांच्या शरीरात तयार होणारे जीवनसत्त्व कोणते?
२) 1 जीबी या एककाने कशाचे मापन करतात?
३) अॅक्सिस बँकेच्या संबंधात वापरला जाणारा रंग कोणता?
४) आपल्या शरीरात छोटेबळकट आणि वर्तुळाकार असलेले स्नायू कुठे कुठे असतात?
५) कोणते पक्षी पाण्यात चोच बुडवतात आणि मग मान वर करून पाणी पितात?
६) कोणत्या रोगाची लागण झाल्यानंतर रोगाची लक्षणे दिसायला 20 वर्षे लागतात?
७) गाईच्या दूधापेक्षा आईच्या दुधामध्ये 200 पटीत असणारा घटक कोणता?
८) जागतिक जल दिन आणि भारतीय राष्ट्रीय नव वर्ष दिन यांमध्ये किती दिवसांचे अंतर असते?
९) समुद्र न ओलांडता जास्तीत जास्त किती खंडांचा प्रवास करता येईल?
१०) हिंसक व्यक्तिच्या शरीरात कोणते रसायन अधिक प्रमाणात तयार होते?

प्रश्न ४ - चूक की बरोबरते स्पष्ट करून लिहा. (गुण २०)
१) आदिवासींची डोंगरातील शेती म्हणजे मक्याचे बियाणे मशागत कलेल्या शेतात नुसते फेकायचे.
२) प्रत्येक प्रौढ भारतीय व्यक्तीला दररोज 24000 किलोकॅलरी इतक्या अन्नाची गरज असते.
३) लहान मुलांसमोर धूम्रपान करणाऱ्या घरच्यांमुळे त्यांच्या मुलांची दृष्टी सुधारते.
४) विदर्भांतील कापूस पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना आत्महत्त्या करण्याची वेळ आली कारण तिथे सिंचन सुविधा नव्हती.
५) रोमन अंकात DC - CD = CC
६) कावळे शंभर वर्षे जगतात.
७) गालावर खळी पडणे हे अनुवंशिक आहे.
८) गुळाचा रस उन्हात वाळवला की पांढरी शुभ्र साखर होते.
९) पृथ्वीवरील वातावरणामुळे ग्रहणात चंद्र लालसर दिसतो.
१०) वाळवंटात विविध प्रकारचे प्राणी आढळून येतात.

प्रश्न ५ - वैज्ञानिक कारण द्या– (गुण २०)
१) किटलीत पाणी तापवताना पाणी गरम होईल तसतसा वाढणारा आवाज उकळी फुटली की बंद होतो.
२) ग्लायफोसेट रसायन घटक असलेल्या तणनाशकांना बंदी घालावी अशी मागणी करण्यात येत आहे.
३) गोडाधोडाचे जेवण करताना मुळा खाल्लेला असला तर ढेकर मुळ्याचीच येते.
४) बर्फाच्या ट्रेला हात लावल्यावर हात चिकटतो.
५) समुद्रात पाऊस पडला नाही की माशांचा दुष्काळ होतो.
६) उन्हाळ्यात माठाच्या पाण्यात वाळा घालतात.
७) डोळे बंद करून चालताना तोल सांभाळणे अवघड जाते.
८) आपला रेकॉर्ड केलेला आवाज ऐकताना वेगळा वाटतो.
९) तापवल्यावर मेण वितळते पण मीठ तडतडते.
१०) मृत्यूनंतर नेत्रदान चार ते सहा तासात करावे लागते.

प्रश्न ६ - सविस्तर उत्तर लिहा– (गुण ३०)
१) बियाण्याचे नवीन वाण शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे?
२) खाद्यपदार्थ तयार करताना वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या क्रिया कोणत्याते स्पष्ट करा. उदा. भाजणे.
३) गुफांमधील आदिमानवांनी काढलेली चित्रे किती जुनी आहेत हे कशावरून ठरवतात?
४) जंक फूड खाण्यामुळे जे शारिरीक नुकसान होते ते कशाकशामुळे आणि कसेकसे होते?
५) ज्वालामुखी क्षेत्रांच्या जवळ राहाण्याचे फायदे-तोटे कोणते?
६) डास मारणाऱ्या बॅटीच्या कोणत्या विशिष्ट रचनेमुळे डास मरतात?
७) लोकमाध्यमांमधून येणारे फोटोव्हिडीओ यांची सत्यता तपासण्यासाठी कोणते मार्ग आहेत?
८) लघुग्रहधुमकेतू आणि उल्का यात फरक काय?
९) वरण-भात-तूप-मीठ-लिंबू कालवून एकत्र खाल्ले तर कोणकोणती पोषणद्रव्ये मिळतातइतकीच पोषणद्रव्ये मिळण्यासाठी दुसरा कोणता संच सुचवाल?
१०) सागराची किंवा महासागराची हद्द कशी ठरवतात?

प्रश्न ७ - चित्र काढून उत्तरे द्या – (गुण १५)
१) थंडीवाराऊन यापासून संपूर्ण शिराचे संरक्षण होण्यासाठी एका नव्या टोपीची रचना करा - जी सहज बनवता येईलस्वस्त असेल आणि दीर्घकाळ टिकेल. आकृती काढा आणि तिचे उपयोग स्पष्ट करा.
२) पाण्यात चोच बुडवून स्ट्रॉने ओढल्यासारखे पाणी पिणारे चार पक्षी कोणते?
३) खेळातले चार फासे एकावर एक असे ठेवायचे की चारही बाजूंनी दिसणाऱ्या ठिपक्यांची संख्या समान असेल.

प्रश्न ८ - करून पहा – (गुण १५)
१) बटरपेपरवर मासा चितारा. कात्रीने नीट कापून घ्या. माशाच्या मध्यावर एक भोक पाडा. परातीत पाणी घ्या. ते संथ झाल्यावर त्यात कागदी मासा मध्यावर ठेवा. माशाच्या भोकात एक थेंब तेल टाका. काय होते?
२) स्वच्छ पायमोजे पायांत घाला. खुरट्या वनस्पती असलेल्या जागेवर पंधरा मिनिटे चाला. घरी परतल्यावर मोज्यात अडकलेल्या विविध प्रकारच्या बिया हलके काढून बहीर्गोल भिंगातून पहा. त्यांची चित्रे काढा व त्यांची नावे लिहा.
३) हवेचे आणि पाण्याचे तापमान समान असले तरी एखादी गरम वस्तू हवेपेक्षा पाण्यात लवकर गार होते – हे वाक्य तपासून पहा. त्यासाठी केलेल्या प्रयोगाची कृती लिहा.

प्रश्न ९- निबंध लिहा–(गुण १५)
वनस्पतींचे आरोग्य धोक्यात?

2020 हे आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य वर्ष’ आहे. वनस्पतींनी निर्माण केलेल्या ऑक्सिजन आणि अन्नामुळे सगळ्या सृष्टीचे पोषण होते. वनस्पतींच्या मूलभूत गरजा कोणत्या असतातवनस्पतींचे आरोग्य कशावर अवलंबून असतेवनस्पतींचे आरोग्य माणूस व अन्य जीवजिवाणूंवर कसे अवलंबून असते सृष्टी राखण्यासाठी वनस्पतींचे आरोग्य राखले पाहीजे कात्यासाठी आपण काय करू शकतो?
=================================
आपल्या उत्तर पत्रिका 15 फेब्रुवारीपर्यंत आम्हाला पाठवा. 
मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग, टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता, पुणे 411030. 
संपर्क – शशी भाटे 9420732852, संजय मा. क. 9552526906

ENGLISH TRANSLATION
Vidnyan Ranjan Competition 2018
gNo entrance fee.gAttractive prizes. g You can find the answers to the questions given below, on your own, or by asking anyone, or by searching anywhere or performing the experiments yourself. g Answer as many questions as you can on a foolscap paper.
gSend your answers to - Marathi Vidnyan Parishad, Pune Vibhag,Tilak Smarak Mandir, Tilak Road, Pune 411030 before 15th February 2018.g Winners of the preliminary round will be announced on 20th February 2020.g Decisions of the judges will be considered final.
gThe final round will be held on 29th February 2020 in Pune. gThe final round shall consist of practical experiments g Scores will be normalized across age groups and educational qualifications by giving bonus points according to the following tables -              
Bonus Points: By Age Group
Up to 13 years
6
14 to 16
4
17 to 20
2
41 to 60
2
61 to 80
4
Beyond 81 years
6
Bonus Points : By Educational Qualification
Up to 5th Standard
10
Up to 7th Standard
9
Up to 10th Pass
7
Up to 12th Pass (Non science Branch)
5
Graduate (Non-Science Branch)
3
11th or higher (Science Branch)
0
 Send your answer papers along with the following information -1.Full Name, 2 Address With PIN Code, 3.Telephone / Mobile Phone Number, 4 E-Mail ID, 5.Date of Birth
 6.Educational Qualification 7.Occupation, 8.Bonus Points  = Educational Qualification Bonus Points + Age Group Bonus Points

Question 1 - Observe and Answer (Marks 20)
1) What is the weight of a 10 rupees coin?
2) What are the differences seen in notes of Rs. 100 printed in 2011 and 2018?
3) Place the palm of your right hand on a table, fold the middle finger and lift all other fingers one at a time, starting from the thumb. Write your observation.
4) If a day of a week occurs five times in a month, what is the sum of its dates?
5) What is the sum of the dots on the opposite sides of a cubical die?
6) What are the bodily effects you experience when you have feeling of misgiving?
7) While writing on a double lined notebook which alphabets in the Devanagari script extend beyond the lines?
8) On a map of India, what is the angle between the two lines connecting Chennai - Mumbai and Chennai-Kolkata?
9) Refer to the map of the State of Maharashtra and name the beach that is the east-most on it.
10) Which and how many geometric figures are visible in the accompanying figure?

Question 2- Who am I?/ Who are we? (Marks 10)
1) Israel took us to the moon to experiment on us, we are octopods.
2) I have 75% of the earth's volcanoes and 90% of earthquake centers.
3) I am the largest river on the earth.
4) My eyes are the largest among four legged mammals.
5) I am a city – out of the nine Nobel laureates of India; five belong to me.
6) We are in the human body and pass on the information from the ears, nose and eyes etc. to the brain.
7) I am a type of phobia, which makes you afraid of anything that has small holes or pores.
8) I originated in the city of Wuhan in China. Although the city was closed on all sides, I spread to other areas.
9) I will travel through Indian space just like Ivan Ivanovich travelled on a Russian spaceship.
10) My eyes have three eyelids and I can see even if these are closed.

Question 3 - Answer in short - (Marks 10)
1) What vitamin is produced in most mammals except humans, apes and guinea pigs?
2) What does the unit of 1 GB measure?
3) What is the color used in connection with Axis Bank?
4) Name the organs in our body that have small, strong, and circular muscles?
5) Which birds first lower their neck, dip their beaks in water and then raise their neck high to drink it?
6) Which disease takes 20 years to show symptoms after its infection?
7) Which component has its quantity present 200 times in mother's milk than in cow's milk?
8) How many days are there between the World Water Day and the New Year Day of Indian National calender?
9) How many continents can one travel without crossing the sea?
10) What chemicals are produced in large quantities in the body of a violent person?


Question 4 –State whether the statements is right or wrong and explain your answer. (Marks 20)
1) Farming for tribal hill farmers means merely randomly throwing the maize grains in their cultivated fields.
2) Every Indian adult needs about 24000 kcal of food daily.
3) Smokers who smoke in front of their children improve their children's eyesight.
4) The cotton farmers in Vidarbha had to commit suicides because there was no irrigation facility.
5) In Roman numerals DC - CD = CC
6) The crow lives for a hundred years.
7) Facial dimples are dominant genetic traits.
8) The juice of the jaggery dried under the sun turns to white sugar.
9) The moon looks reddish in colour during eclipse due to the atmosphere on earth.
10) Highly diverse kinds of living beings are found in the desert.

Question 5- Give scientific reasons - (Marks 20)
1) The noise of bubbles in a kettle rises on heating but stops as the water boils.
2) It is demanded that weedicides containing glyphosate chemicals be banned.
3) During a meal though we eat a variety of food items like desserts along with a little radish; the burp consists mainly of radish only.
4) Why does your finger stick to an ice tray in a refrigerator?
5) Acute shortage of marine fish occurs when it does not rain in the sea.
6) In summer, we put khus (Vetiver) in an earthen pot which is used for drinking water.
7) Keeping your balance is difficult with eyes closed.
8) When you listen to your voice in a recording, it sounds different than the voice you're used to hearing.
9) After heating, wax melts but salt decrepitates.
10) Retina must be removed within four to six hours after death of an eye donor.

Question 6 - Write Answers in details - (Marks 30)
1) What things should be considered by people looking for new seed varieties?
2) Describe different activities used in preparing food? e.g. roasting.
3) How is it decided how old the pictures drawn by the primitive humans living in the caves are?
4) What physical harm is caused by eating junk food and how?
5) What are the advantages and disadvantages of living near volcanic areas?
6) Which specific part in the design of the bug zappers (mosquito bats) causes mosquitoes to die?
7) What are the ways to check the authenticity of photos, videos used in the media?
8) What is the difference between asteroids, comets and meteors?
9) What nutrients do you get when you eat dal-cooked rice-ghee-salt and lemon all mixed together? What other food mixture would you recommend to get the same nutrients?
10) How do you determine the boundaries of a sea or a ocean?

Question 7 - Answer by drawing an image. - (Marks 15)
1) Design a new hat to protect your head against cold, wind and sun - which can be easily made, is cheap, and will last long. Draw a diagram and explain its uses.
2) Draw images of any four birds that suck and drink water as if their beaks are straws?
3) Keep the four cubical dies one over the other so that the number of dots appearing on all four sides is equal.

Question 8 - Try doing this - (Marks 15)
1) Draw a fish on butter paper. Cut out its shape with scissors. Cut a small hole in the middle of the fish. Take water in a bowl. Place the paper fish on the surface of water. As it becomes still, add a drop of oil in the fish hole. Describe what happens.
2) Put clean socks on your feet. Go walking for fifteen minutes on ground that has brush or short bushes. On returning, remove the various seeds that are stuck in the socks. Observe them through a convex lens. Draw pictures of the seeds and name them.
3) A hot object immersed in water cools faster than when kept in air of the same temperature - check veracity of this statement. Write down the procedure of this experiment to prove the statement.


Question 9- Write an essay - (Marks 15)
Is plant health under threat?
2020 is the International year of Plant Health. The oxygen and food produced by the plants nourishes the entire life on the earth. What are the basic needs of the plants? What factors are responsible for health of the plants? How does the health of plants depend on humans and other organisms? Should the health of plants be maintained to preserve life on the earth? What can we do for it?


Tuesday, November 26, 2019

चुकेल तो शिकेल - learning from errors

आपले मूल वैज्ञानिक कसे होईल?
चुकेल तो शिकेल
एखादा नवीन वैज्ञानिक शोध लागला किंवा विज्ञान दिन आला की अनेक पालकांना असं वाटतं की आपल्या मुलांनी वैज्ञानिक व्हायला पाहिजे. पण आपला मुलगा किंवा मुलगी वैज्ञानिक दृष्टीकोनाने वागत असताना आपण त्याकडे दुर्लक्ष तर करत नाही ना?.
आपल्या पाल्यांच्या वाढीबद्दल अनेक पालक जागृत असतात. आपल्या पाल्यांना चांगला आहार देतात. चांगले कपडे करतात, चांगली पुस्तक वाचायला देतात, चांगले अनुभव देतात, उत्तम शाळेत घालतात आणि आपल्या पाल्याच्या आवडीनिवडी पुरवणं ही कामं अनेक पालक आपआपल्या परीने करत असतात. त्या पालक आणि पाल्य दोघांनाही आनंद असतो. खेळ, खेळणी, आधुनिक इलेक्ट्रॉनिक साधने देखील मुलांच्या हाती देतात. कधी कधी इलेक्ट्रॉनिक किंवा आधुनिक साधनांबाबत असं पहायला मिळतं की पालकांपेक्षा ही छोटी मुले ही साधने हाताळण्यात तरबेज असतात. तुमच्या मोबाईलचा पासवर्ड किंवा ठिपक्यांच्या रांगोळीसारखा पॅटर्न एक वेळ तुम्ही विसराल पण तुमच्या मुलांना सहज लक्षात राहतो. ते त्याचा वापर करून तुमच्या न कळत तुमचा मोबाईल वापरूही शकतात. त्यांच्याकडे ही हुशारी येते कुठून?

आपण जन्माला येताना आपल्या मेंदूत अब्जावधी पेशी घेऊन जन्माला येतो. या पेशींना न्युरॉन म्हणतात. आपल्याला जे जे दिसते, ऐकू येते, स्पर्शाला लागते, जे वास येतात, ज्या चवी लागतात त्या त्या सर्व गोष्टी  आपल्या ज्ञानेंद्रियांमार्फत मेंदूपर्यंत जातात. ते अनुभव होत असताना न्युरॉनमध्ये जाळ्या विणल्या जाऊन अनुभवांची कायमची नोंद मेंदूत होत असते. समजा आपण आयुष्यात पहिल्यांदा ड्रॅगन फ्रूट खात असू तर आपल्याला कोणातरी त्या फळाचे नाव ड्रॅगन फ्रूट असल्याचे सांगते. तो आवाज आपल्या कानातून मेंदूत जाऊन काही न्यूरॉनमध्ये त्याची नोंद होते. डोळ्याने पहाताना ड्रॅगन फ्रूटच्या सालाचा गुलाबी रंग, पाकळ्यांसारखी रचना याची नोंद मेंदूत होत. बोटांना झालेला ड्रॅगन फ्रूटचा ओलसर स्पर्श मेंदूत नोंदवला जातो. मग साल सोलताना किती जोर लावायला लागतो हेही मेंदू नोंदवून ठेवतो. सालीच्या आत खळीसारखा दिसणारा गर, खसखशीच्या दाण्यापेक्षाही बारीक काळ्या बिया यांचं दिसणं, रंगरूप, स्पर्श, वास, चव यांची नोंद आपल्या शरीरातील न्युरॉनमध्ये होते. आपण ड्रॉगन फ्रूटची फोड खातो तेव्हा जिभेला तिचा स्पर्श होतो, गारपणा, चिकटपणा, चव याही गोष्टींची नोंद न्युरॉनमध्ये होते. चव, स्पर्श, रंगरूप, आवाज, वास मेंदूत वेगवेगळ्या भागातल्या न्यूरॉनमध्ये नोंदले जातात. मात्र त्या सर्वांची मिळून एक सांगड घातली जाते. पुढे कधी ड्रॅगन फ्रूट बघितले किंवा शब्द ऐकला किंवा डोळे मिटून त्याला स्पर्श केला किंवा कोणी फोड आपल्या तोंडात घातली तर आधीच्या अनुभवांच्या बळावर जोडल्या गेलेल्या न्युरॉनच्या कोणता तरी एका भाग तार छेडल्यासारखा छेडला जातो आणि त्याला जोडल्या गेलेल्या सर्व न्युरॉनमध्ये तो कंप पसरतो आणि आपल्याला ड्रॅगन फ्रूटचे पुन्हा ज्ञान होते. अशा प्रकारे विविध वस्तूंच्या विविध अनुभवांमधून सांघल्या गेलेल्या जोडण्या छेडल्या जातात आणि आपले ज्ञान व्यक्त होते. आपण हुशार असल्याचे सिद्ध होते. 

आपली मुलेही हुशार व्हायची असतील तर काय करायला पाहिजे? तर मेंदूत होणाऱ्या या जोडण्या एक म्हणजे भरपूर असल्या पाहिजेत, दुसरं म्हणजे त्या पक्क्या व्हायला पाहिजेत आणि तिसरं म्हणजे त्यांना आणखी जोडण्या जोडल्या गेल्या पाहिजेत. 

मेंदूत होणाऱ्या न्युरॉनच्या जुळण्या वाढण्यासाठी आपण आपल्या मुलामुलींना अनुभव घेण्यासाठी अनेक संधी दिल्या पाहिजेत. अनेक पालक काही ना काही कारणांनी मुलामुलींना अनुभव घेऊ द्यायला नाकारतात. अगदी लहान असताना मूल पेटलेल्या उदबत्तीकडे आकर्षित होत असते, तिच्यातून निघणारा धूर, तिचा वास, उदबत्तीच्या टोकाला असणारा लालबुंद जळता भाग त्याला दिसत असतो आणि त्याला त्या जळत्या टोकाला स्पर्श करायची ओढ लागते. उदबत्तीला हात लागला तर चटका बसणार हे आपल्या मुलाला समजत नाही आणि त्याला तो बसू नये म्हणून आपण प्रयत्न करत राहतो. स्स् हाम्हणत त्याला रोखत असतो. पण यामुळे धूर हातात पकडता येत नाही हेही शहाणपण अनुभवातून मिळण्यापासून आपण आपल्या बाळाला रोखत असतो. चटका बसायला नको पण उदबत्तीच्या धुराशी खेळायला मिळेल - हे कसं साधायचं - यात आपली हुशारी दिसून येईल. बघा  बाळाला वाढवताना आपलीही वाढ होते की नाही

तर आपल्या मुलांमुलींना अनेक अनुभव घेण्याची संधी आपण मिळू दिली पाहिजे. तर त्यांचा मेंदूत अनुभवसंपन्न जोडण्यांची जाळी निर्माण होतील. हे अनुभव मिळवून देण्यासाठी मुलांना सोबत घेऊन आपल्या रोजच्या जगण्यात करता येण्यासारख्या किती तरी गोष्टी आहेत. घरात स्वयंपाक करत असताना त्यांना सोबत घेऊन बघा. समजा सायीचे दही घुसळून त्याचे ताक करायचे आहे. हे काम करताना रंग रूप, वास, स्पर्श, आवाज अशा गोष्टींचे अनुभव तर येतीलच पण लोणी का तरंगते असा प्रश्नही तुमच्या मुलामुलीच्या मनात येईल. तो त्यांनी विचारला की तुम्ही त्याचे उत्तर द्या की लोणी ताकापेक्षा हलके असते म्हणून तरंगते. आता त्या पुढे जाऊन कोणत्या गोष्टी हलक्या आणि कोणत्या जड आहेत हे ओळखण्यासाठी तुमच्या पाल्याने पाण्याचा वापर केला की तो झाला हुशार आणि त्याचे वैज्ञानिक कुतूहलही वाढलेच ना? इथं तुम्ही त्याला मोकळीक नाही दिलीत तर त्याचे कुतुहल कोमेजेल आणि बुद्धीमत्ताही खुंटेल. ही वाईट गोष्ट व्हावी असं तुम्हाला नक्कीच वाटत नसणार.

तर तुम्ही आपल्या मुलाबाळांना अनुभव मिळू देण्याच्या संधी द्याल अशी मला आशा आहे. त्याही पुढे जाऊन अशा संधी अनेक वेळा द्यायला हव्यात. कारण एकदा आलेला अनुभव पुन्हा पुन्हा आला तर त्याच्या मेंदूतल्या न्युरॉनच्या जोडण्या पक्क्या होतील. समजा तीच कृती करताना तोच अनुभव पुन्हा आला नाही तर? तर त्यात काही बिघडत नाही. उलट त्यामुळे आपली चूक काय झाली हे शोधायला तुमचे मूल उद्युक्त होईल. अर्थात त्यासाठी तुमच्याकडे थोडी सहनशिलता हवी. कदाचित काही नुकसान झाले तरी ते सोसायची तयारी ठेवायला पाहिजे. तसे काही ग करता – चुकीला क्षमा नाही – म्हणत तुम्ही मुलाला शिक्षा केलीत तर त्याची समजूत अशी होईल की प्रयोगातून शिकता येत नाही तर शिक्षा येते. अशा प्रकारे वागणाऱ्यांची मुले नवीन काही शोध घ्यायला कचरतात. इतरांसारखेच करू पहातात. आत्मविश्वास गमावतात. तर अनुभव घेताना चुका झाल्या तर ती शिकण्याची एक नवी संधी मावी म्हणून त्या कडे बघायला पाहीजे. सध्या जैवतंत्रज्ञान या विषयात प्रगतीच्या खूप संधी आहेत. जैवतंत्रज्ञानाबद्दल असे म्हणतात की – या क्षेत्रात वैज्ञानिक व्हायचे असेल तर आपला प्रयोग फसल्याबद्दल  आनंदीत होता आले पाहीजे, म्हणजे त्याला एका चुकीच्या मार्गावर फुली मारून नवा मार्ग शोधण्यासाठी नवे बळ मिळायला लागणार.
आता तिसरी गोष्ट. आपल्या मुलामुलीच्या डोक्यात झालेल्या ज्ञानाच्या जोडण्या पुढे सरकत राहायला हव्यात. मला झालेले ज्ञान हेच सर्व श्रेष्ठ आणि अंतीम आहे असा गर्व आपल्या मुलामुलीला येता कामा नये. आपली स्पर्धा स्वत:शी आहे असे मानले पाहिजे. मी कालच्यापेक्षा आज चांगले करीन आणि आजच्यापेक्षा उद्या चांगले करीन असा विश्वास आपल्या पाल्यात निर्माण व्हायला हवा. त्यासाठी चांगले म्हणजे नेमके काय हेही समजले पाहीजे. त्यासाठी एकमेकांशी सहज संवाद होईल असे वातावरण घरात राखायची गरज आहे. आई आणि लेकीत असे संबंध असतात तसे ते बापलेकात, बापलेकीत, आईलेकात असण्यासाठी आपण आपल्या घरात प्रयत्नपूर्वक प्रोत्साहीत करणारे वातावरण राखले पाहीजे. आपली मुले नव्या जगात वावरतात त्यामुळे त्यांना आपल्याला न मिळालेले, न मिळू शकणारे अनुभव मिळालेले असू शकतात त्यामुळे आपल्याला त्यांच्याकडूनही घेण्यासारखे काही असू शकते अशी भावना पालकांमध्ये असली की त्याचा एक सकारात्मक परिणाम संपूर्ण घरावर होतो आणि त्या घरातील वातावरण मोकळे आणि पुढे प्रगती व्हायला पोषक होते.

अशा प्रकारे प्रयोग करणे, अनुभव घेणे, त्यातल्या निरीक्षणांमधून काही निष्कर्ष काढणे आणि आपले निष्कर्ष आपल्यापुरते न ठेवता इतरांच्या परिक्षणालाही उतरणे हे सगळे टप्पे वैज्ञानिकतेकडे घेऊन जाणारे आहेत. याची आपल्याला कायमची गरज आहे. जेव्हा लोक झुंडीच्या विचाराला बळी पडतात अशा समाजात तर वैज्ञानिक विचारसरणीची खूपच गरज आहे.

विनय र. र.